गणपती म्हणून सुपारीची पूजा का केली जाते? काय आहे त्या मागचं अध्यात्मिक कारण? जाणून घ्या

0
1
Ganesh_Pujan

हिंदू धर्मात कोणतीही पूजा करायची झाली तर प्रथम विघ्नहर्त्या विनायकाचं अर्थात गणपती बाप्पाचं आवाहन केलं जातं. गणपतीच्या पूजेनंतर खऱ्या अर्थाने पूजेला सुरुवात होते. पण तुम्ही कधी पाहिलं आहे का? पूजेवेळी पुजाधिकारी सुपारीला गणपतीचा मान देतो. तसेच सुपारीला गणपती मानत पुजेस सुरुवात करतो. त्यामुळे सुपारीलाच असा मान का मिळतो? इतर फळं का नाहीत? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पौराणिक धर्मग्रंथानुसार, सुपारीला पूर्ण फळ मानलं गेलं आहे. सुपारीत कोणत्याही प्रकारची पोकळी नसते, त्यामुळे या फळाला अध्यात्मिक मान मिळाला आहे. सुपारीला देवतांचं प्रतिक मानलं गेलं आहे. पुराणानुसार, ऋषीमुनी ध्यानधारणा करून प्रत्यक्ष देवांना आवाहन करत आणि ते प्रकट होत असत. पण धार्मिक ग्रंथानुसार, कलियुगात असं काही शक्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे. पण पूर्ण फळाची स्थापना केली तर त्यात देवाचा वास असेल असं पुराणात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पूजेत सुपारीला मान मिळाला आहे.

नवग्रह शांती पूजेतही सुपारींना त्या त्या ग्रहांचा मान दिला जातो. तांदळाची रास करून त्यावर सुपारी प्रतिष्ठापना केली जाते. दुसरीकडे, देवीदेवतांना विड्याचा मान दिला जातो. त्यावर सुपारी ठेवली की मान पूर्णत्वास येतो. विड्याची पाच पान आणि त्यावर सुपारी असली देवापर्यंत पोहोचते अशी धार्मिक मान्यता आहे. यातून सुपारीसारखी कठीण जीवनात कोमलता आण असं मानलं जातं. पूजेत वापरली गेलेली सुपारी वाहत्या पाण्यात विसर्जित करावी किंवा एखाद्या लाल कापडात बांधून अक्षतांसह तिजोरीत ठेवावी. सुपारीबाबत ज्योतिषशास्त्रात काही तोडगेही सांगण्यात आले आहेत.

(Disclaimer : ही माहिती पुराण, धार्मिक ग्रंथ, ज्योतिषशास्त्र आणि मान्यतेवर आधारीत आहे. MahaMarathiNews.com या माहितीचं समर्थन किंवा पुष्टी करत नाही.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here