पॅनकार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी अत्यावश्यक दस्ताऐवज आहे. बँकिंग व्यवहारासाठी अत्यंत आवश्यक आहे. तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर आर्थिक व्यवहार करताच येणार नाही. इतकंच काय तर आयकरासंदर्भारत कोणतंही काम होणार नाही. भारतात जवळपास बँकेशी निगडीत सर्व कामांसाठी आणि टॅक्सशी निगडीत कामासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. पॅनकार्डसाठी भारतात कोणत्याच प्रकारचं वय निश्चित केलेलं नाही. त्यामुळे भारतात कोणीही पॅनकार्डसाठी अर्ज करू शकतो. देशातील जवळपास 80 ते 90 टक्के लोकांकडे पॅनकार्ड आहे. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लहान मुलांचं पॅनकार्ड निघतं का? लहान मुलांसाठीही पॅनकार्डची गरज आहे का? वगैरे वगैरे.. मुलांच्या पॅनकार्डसाठी काही नियम व अटी आहेत का? तर या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला पुढे मिळतील.
लहान मुलांचं पॅनकार्ड काढता येतं. यासाठी काही नियमावली आखण्यात आली आहे. जर 18 वर्षाखालील कोणीही अल्पवयीन व्यक्ती पॅनकार्डसाठी अर्ज करू शकतो. पण त्याची ही अर्ज प्रक्रिया आई-वडिल किंवा कायदेशीर पालकांनी पूर्ण करणं आवश्यक आहे. म्हणजेच अल्पवयीन स्वत: पॅनकार्ड अर्ज करू शकत नाही. त्यासाठी त्याला आई वडिलांची मदत घ्यावीच लागते. दुसरं सांगायचं तर अगदी एका वर्षाच्या बाळाचही पॅनकार्ड काढता येते.
लहान मुलांच्या पॅनकार्डसाठी कसा अर्ज करायचा?
18 वर्षाखालील मुलाचं पॅनकार्ड तयार करायचं असल्यास पहिल्यांदा पॅनकार्डच्या अधिकृत वेबसाईटवर https://nsdl.co.in/ जावं लागेल. त्यानंतर 18 वर्षाखालील कॅटेगरीत अर्ज करायचं ते सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट केल्यानंतर समोर तुमच्याकडे माहिती मागितली जाईल, ती त्या ठिकाणी भरा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदर मुलांचं वयाचा दाखला देणारं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर आई वडील किंवा कायदेशीर पालकांचं दस्ताऐवज अपलोड करावे लागेल. त्यानंतर आई वडील किंवा कायदेशीर पालकाची सही अपलोड करावी लागेल. त्यानंतर पॅनकार्डसाठी एक रक्कम भरावी लागेल. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर सबमिटवर क्लिक केलं की झालं. 15 दिवसात तुम्ही अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर पॅनकार्ड येतं.