झेड, झेड प्लस, वायसह सहा प्रकारचं असते सुरक्षाकवच, कोणत्या कॅटेगरीत काय ते जाणून घ्या

0
5
Police_Security_Categary
एसपीजी, झेड प्लस, झेड, वाय प्लस, वाय आणि एक्स सुरक्षाकवच

Security categories in India : भारतात राजकीय स्थिती वेगळी आहे. राजकारणात वावरणाऱ्या व्यक्तींना कायम सतर्क राहावं लागतं. कधी कुणाच्या भावना दुखावतील आणि जीवघेणा हल्ला होईल सांगता येत नाही. यासाठी गुप्तचर यंत्रणा पाळत ठेवून असते. एखादी मोठी घटना घडू नये यासाठी आधीपासूनच काळजी घेतली जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यमंत्री यांच्यासाठी एक खास सुरक्षाकवच असतं. त्याचबरोबर विशेष व्यक्तींना एक खास प्रकारची सुरक्षा प्रदान करण्यात येते. एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्यासाठी धमकी वगैरे आली तर विशेष सुरक्षा पुरविली जाते. सुरक्षाकवच सहा श्रेणीत विभागली गेली आहे. यात झेड, झेड प्लस, वाय, वाय प्लस, एक्स आणि एसपीजी सुरक्षेचा समावेश आहे.

कोणाला दिली जाते सुरक्षा?

देशातील प्रतिष्ठीत व्यक्ती, राजकीय नेते यांना खासकरून सुरक्षा दिली जाते. सार्वजनिक जीवनात वावरताना कधी कोण हल्ला करेल सांगता येत नाही. अशा स्थितीत त्यांना खास सुरक्षाकवच प्रदान केलं जातं. मंत्री आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांना मिळणाऱ्या सुरक्षेत फरक असतो. प्रतिष्ठित व्यक्तींना जीवाला धोका असल्याचं कळताच सुरक्षायंत्रणांना आधी कळवावं लागतं. गुप्तचर यंत्रणांमार्फत पडताळणी केली जाते. त्यानंतर सुरक्षा प्रदान केली जाते. गृहसचिव, महासंचालक आणि मुख्य सचिवांची समिती कोणाला कोणत्या प्रकारची सुरक्षा द्यायची हे ठरवते.

प्रतिष्ठित व्यक्तींना कोण देते सुरक्षा?

पोलिसांसह काही सुरक्षा यंत्रणा प्रतिष्ठित व्यक्तींच्या सुरक्षेसाठी प्रदान केले जातात. यात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एसपीजी, एनएसजी, आयटीबीपी आणि सीआरपीएफचा समावेश आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी या व्यक्तींच्या खांद्यावर असते. पण मागच्या काही वर्षात झेड प्लस सुरक्षाकवच असल्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडेही सोपण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या श्रेणीत कशी सुरक्षा असते ते..

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सुरक्षा : देशातील सर्वात ताकदीचं सुरक्षाकवच आहे. 1985 साली तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर या सुरक्षेची सुरुवात झाली. हे सुरक्षाकवच भेदणं अशक्य आहे. या ताफ्यातील सुरक्षारक्षक आधुनिक सुरक्षा यंत्रणांसह सज्ज असतात. पंतप्रधान आणि माजी पंतप्रधान यांनी ही सुरक्षा पुरविली जाते.

झेड प्लस सुरक्षाकवच : या सुरक्षाकवचात प्रतिष्ठीत व्यक्तीच्या सुरक्षेसाठी 36 सैनिक तैनात असतात. यात आयटीबीपी किंवा सीआरपीएफ कमांडो, 10हून अधिक एनएसजी कमांडो आणि राज्य पोलिसांचा समावेश असतो.

झेड सुरक्षाकवच : या श्रेणीत चार ते पाच एनएसजी कमांडोसह 22 सुरक्षारक्षक असतात. पोलीस, आयटीबीपी किंवा सीआरपीएफ कमांडो आणि स्थानिक पोलिसांचा समावेश असतो.

वाय प्लस सुरक्षाकवच : या श्रेणीत 11 सुरक्षारक्षक असतात. यात एक किंवा दोन कमांडो असतात. तसेच दोन पीएसओचाही समावेश असतो. तसेच 24 तास एक पोलीस कर्मचारी तैनात असतो.

वाय सुरक्षाकवच : या श्रेणीत 11 सुरक्षारक्षक असतात. यात दोन खासगी सुरक्षा रक्षकांचा समावेश असतो. पण कमांडो नसतो.

एक्स सुरक्षाकवच : या श्रेणीत दोन सुरक्षारक्षक तैनात असतात. यात एक पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here