विधानसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 जणांचा नावावर लागली मोहोर

महायुतीनंतर महाविकास आघाडीच्या जागांचा प्रश्न सुटताना दिसत आहे. काँग्रेसने पहिल्या 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. खरं तर महाविकासआघाडीत मोठा भाऊ कोण हा प्रश्न असताना काँग्रेसने 48 जणांची नावं जाहीर केली आहेत. त्यामुळे कोणाच्या वाटेला किती जागा आहेत संपूर्ण यादी जाहीर झाल्यावरच कळेल, असं दिसतंय.

0
12
Nana_Patole_Amit_Deshmukh
फोटो : Nana Patole Twitter

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालं आहे. त्याच पार्श्ववर काँग्रेसने महाविकास आघाडीत सर्वाधिक जागांची मागणी केली होती. त्यानंतर बरीच चर्चा झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट यांच्या 85-85-85 चा फॉर्म्युला ठरला. तर उर्वरित 33 जागांचा तिढा कायम असून लवकरच सोडवला जाईल असं दिसत आहे. उद्धव ठाकरे गटाने 65 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. शरद पवार गटाने 45 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसने 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, काँग्रेसने भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

  • नाना पटोले, साकोली
  • गोपालदास अग्रवाल, गोंदिया
  • सुभाष धोटे, राजुरा
  • विजय वडेट्टीवार, ब्रह्मपुरी
  • सतीश वारजुकर, चिमूर
  • माधवराव पवार-पाटील, हदगाव
  • तिरुपती कोंडेकर, भोकर
  • मीनल पाटील खदगावकर, नायगाव
  • सुरेश वरपुडकर, पाथरी
  • विलास औताडे, फुलंब्री
  • मुझ्झफर हुसैन, मीरा भाईंदर
  • अस्लम शेख, मालाड-पश्चिम
  • नसीम खान, चांदिवली
  • ज्योती गायकवाड, धारावी
  • अमिन पटेल, मुंबादेवी
  • संजय जगताप, पुरंदर
  • संग्राम थोपटे, भोर
  • रवींद्र धंगेकर, कसबा
  • बाळासाहेब थोरात, संगमनेर
  • प्रभावाती घोगरे, शिर्डी
  • धीरज देशमुख, लातूर ग्रामीण
  • अमित देशमुख, लातूर, शहर
  • सिद्धराम मेहेत्रे, अक्कलकोट
  • पृथ्वीराज चव्हाण, कऱ्हाड, दक्षिण
  • ऋतूराज पाटील, कोल्हापूर दक्षिण
  • राहुल पाटील, करवीर
  • राजू आवळे, हातकणंगले
  • विश्वजीत कदम, पलूस कडेगाव
  • विक्रमसिंग सावंत, जत
  • के.सी. पाडवी, अक्कलकुवा
  • राजेंद्र गावित, शहादा
  • किरण दामोदर, नंदुरबार
  • शिरीशकुमार नाईक, नवापूर
  • प्रवीण चौरे, साक्री
  • कुणाल पाटील, धुळे, ग्रामीण
  • धनंजय चौधरी, रावेर
  • राजेश एकाडे, मलकापूर
  • राहुल बोंद्रे, चिखली
  • अमित झनक, रिसोड
  • वीरेंद्र जगताप, धामगाव रेल्वे
  • सुनील देशमुख, अमरावती
  • यशोमती ठाकूर, तिवसा
  • अनिरुद्ध देशमुख,अचलपूर
  • रणजीत कांबळे, देवळी
  • प्रफुल्ल गुडधे, नागपूर-दक्षिण पश्चिम
  • बंटी शेळके, नागपूर, मध्य
  • विकास ठाकरे, नागपूर पश्चिम
  • नितीन राऊत, नागपूर उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here