महायुतीनंतर महाविकासआघाडीकडून उमेदवारांच्या यादी जाहीर होत आहे. उद्धव ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर लगेचच शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केले आहे. एकूण 45 जणांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. यात विद्यमान आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, शरद पवार बारामतीत काय खेळी करतात याकडे लक्ष लागून होतं. अजित पवारांविरोधात कोणता उमेदवार देणार याची उत्सुकता होती. अखेर युगेंद्र पवार यांना उमेदवारी देऊन अजित पवारांची अडचण केली आहे. त्यामुळे अजित पवारांना स्वत:चा मतदारसंघात निवडून येण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पहिली यादी जाहीर
- बारामती – युगेंद्र पवार
- कोपरगाव – संदीप वरपे
- शेवगाव – प्रताप ढाकणे
- पारनेर – राणी लंके
- आष्टी – मेहबूब शेख
- करमाळा – नारायण पाटील
- सोलापूर शहर उत्तर – महेश कोठे
- चिपळूण – प्रशांत यादव
- कागल – समरजीत घाटगे
- तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
- हडपसर – प्रशांत जगताप
- इस्लामपूर – जयंत पाटील
- काटोल – अनिल देशमुख
- घनसावंगी – राजेश टोपे
- कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
- मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
- कोरेगाव – शशिकांत शिंदे
- बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
- जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
- इंदापूर – हर्षवर्धन पाटील
- राहुरी – प्राजक्त तनपुरे
- शिरुर – अशोक पवार
- शिराळा – मासिंगराव नाईक
- विक्रमगड – सुनील भुसारा
- कर्जत – जामखेड – रोहित पवार
- अहमदपूर – विनायकराव पाटील
- सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
- उदगीर – सुधाकर भालेराव
- भोकरदन – चंद्रकांत दानवे
- तुमसर – चरण वाघमारे
- किनवट – प्रदीप नाईक
- जिंतूर – विजय भामरे
- केज – पृथ्वीराज साठे
- बेलापूर – संदीप नाईक
- वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
- जामनेर – दिलीप खोडपे
- मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
- मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
- नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
- किरोडा – रविकांत गोपचे
- अहिरी – भाग्यश्री आत्राम
- बदनापूर – बबलू चौधरी
- मुरबाड – सुभाष पवार
- घाटकोपर पूर्व – राखी जाधव
- आंबेगाव – देवदत्त निकमs