विधानसभा निवडणूक 2024 साठी अर्ज दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यामुळे आता प्रमुख पक्षांनी बंडखोरांना शमवत उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. सर्वात आधी भाजपाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 38 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत नवाब मलिक आणि टिंगरे या विद्यमान आमदारांचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपाचा विरोध असल्यानेच नवाब मलिक यांना उमेदवारी दिली नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची पहिला यादी जाहीर
- अजित पवार, बारामती
- दिलीप वळसे पाटील, आंबेगाव
- सुलभा खोडके, अमरावती
- दत्तात्रय भरणे, इंदापूर
- अण्णा बनसोडे, पिंपरी
- निर्मला विटेकर, पाथरी
- सुनील शेळके, मावळ
- छगन भुजबळ, येवला
- हसन मुश्रीफ, कागल
- माणिकराव कोकाटे, सिन्नर
- अदिती तटकरे, श्रीवर्धन
- संजय बनसोडे, उदगीर
- राजकुमार बडोले, अर्जुनी मोरगाव
- प्रकाश सोळंखे, माजलगाव
- मकरंद पाटील, वाई
- दिलीप मोहिते पाटील, खेड आळंदी
- संग्राम जगताप, अहिल्यानगर
- दत्तात्रय भरणे, इंदापूर
- बाबासाहेब पाटील, अहमदपूर
- नितीन पवार, कळवण
- आशुतोष काळे, कोपरगाव
- किरण लहामटे, अकोले
- राजू नवघरे, वसमत
- शेखर निकम, चिपळूण
- अतुल बेनके, जुन्नर
- यशवंत माने, मोहोळ
- चेतन तुपे, हडपसर
- सरोज अहिरे, देवळाली
- राजेश पाटील, चंदगड
- हिरामण खोसकर, इगतपुरी
- राजू कारेमोरे, तुमसर
- इंद्रनील नाईक, पुसद
- भरत गावित, नवापूर
- नजीब मुल्ला, मुंब्रा कळवा
- नरहरी झिरवळ, दिंडोरी
- धर्मराव आत्राम, अहेरी
- अनिल पाटील, अंमळनेर
- दौलत दरोडा, शहापूर
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी जोपासून आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे पाऊल टाकत आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. मी सर्व उमेदवारांना त्यांच्या यशस्वी… pic.twitter.com/T6MOZPf5gs
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 23, 2024
आता या विधानसभा क्षेत्रात शरद पवार कोणता उमेदवार देतात याची उत्सुकता आहे. दरम्यान अजित पवारांविरुद्ध बारामतीतून युगेंद्र पवार उतरणार आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे.