महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्ष यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुका होणार असून सत्तास्थापनेसाठी 145 चा आकडा गाठणं गरजेचं आहे. राज्यातील पहिली विधानसभा निवडणूक 1960 साली पार पडली होती. तेव्हा काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. तर सभापती सयाची सिलम होते. त्यानंतर 1962, 1967, 1972, 1978, 1980, 1985, 1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 साली विधासभेच्या निवडणुका पार पडल्या. 14व्या विधानसभा निवडणुकीच भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपाला 105 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेकडे फूट पडण्यापूर्वी 55 जागा होत्या. काँग्रेसकडे 45 आणि राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी 53 जागा होत्या. तर मनसेकडे एक जागा होती.
महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागांसाठी निवडणूक पार पडणार?
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून या सर्व जागांवर निवडणुका होणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान कधी होणार आहे?
महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर 2024 ला मतदान होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी मतमोजणी कधी होणार आहे?
महाराष्ट्र विधानसभेसाठी 23 नोव्हेंबर 2024 ला मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार कधी अर्ज करू शकतील?
निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार 22 ऑक्टोबर 2024 पासून आपला अर्ज दाखल करू शकतात. निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2024 आहे.
निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख काय?
निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2024 आहे.