मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पदार्पणाचा सामना कसा होता? पाकिस्तानविरुद्ध जिंकलो की हरलो? जाणून घ्या

0
0
Sachin_Tendulkar_Instagram
Photo Credit : Sachin Tendulkar Official Instagram Account

Sachin Tendulkar First Match Impact : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटविश्वात देवाचा दर्जा दिला गेला आहे. कारण सचिन तेंडुलकरने क्रिकेटचा एक काळ गाजवला आहे. त्याची फलंदाजी पाहण्याचा योग मिळणं म्हणजे लोकं धन्य समजत होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात 15 नोव्हेंबर 1989 झाली. पाकिस्तान विरूद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला होता. कराचीच्या नॅशनल स्टेडियमध्ये हा सामना झाला होता. सचिनने पदार्पण केलेल्या सामन्यात ख्रिस श्रीकांत कर्णधार होता.

सचिन तेंडुलकरने पदार्पण केलेल्या सामन्यात अशी होती प्लेइंग 11

ख्रिस श्रीकांत (कर्णधार) , नवजोत सिद्धू , संजय मांजरेकर , मोहम्मद अझरुद्दीन , मनोज प्रभाकर , सचिन तेंडुलकर , रवी शास्त्री , कपिल देव , किरण मोरे (विकेटकीपर) , अर्शद अयुब , सलील अंकोला.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 10 गडी गमवून 409 धावा केल्या होत्या. या डावात सचिन तेंडुलकरने एक षटक टाकलं होतं. यावेळी त्याने 10 धावा दिल्या. पाकिस्तानने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 262 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडे 147 धावांची आघाडी होती. सचिन तेंडुलकरने या डावात सहाव्या क्रमांकावर उतरला 24 चेंडूचा सामना करत 2 चौकारांसह 15 धावा केल्या होत्या. तर वकार युनिसने त्याचा त्रिफळा उडवून तंबूत पाठवलं होतं.

दुसऱ्या डावात 147 धावांच्या पुढे खेळताना पाकिस्ताने 5 विकेट गमवून 305 धावांवर डाव घोषित केला. पाकिस्तानने भारतासमोर 452 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दुसऱ्या डावात सचिन तेंडुलकरने 4 षटकं टाकली आणि 15 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या डावात सचिन तेंडुलकरच्या वाटेला बॅटिंगच आली नाही. भारताने विजयी धावांचा पाठलाग करताना पाचव्या दिवसापर्यंत झुंज दिली. संजय मांजरेकरने 243 चेंडूंचा सामना करत 13 चौकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. तर नवजोत सिद्धूने 85 धावांची खेळी केली. भारताने 3 गडी गमवून 303 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना ड्रॉ झाला.

सचिन तेंडुलकरची कसोटी कारकिर्द

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम रचले आहेत. त्यापैकी काही विक्रम मोडणं अशक्य देखील आहे. सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट कारकिर्दित 200 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 329 डावात खेळी केली. त्याने 29437 चेंडूचा सामना केला आणि 53.79 च्या सरासरीने 15921 धावा केल्या आहेत. 51 शतकं आणि 68 अर्धशतकांचा समावेश आहे. 6 द्विशतकं ठोकली असून 2058 चौकार आणि 69 षटकार मारले आहेत. तसेच गोलंदाजीत 145 डावात 4240 चेंडू टाकले. यात त्याने 46 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 3.53 इतका होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here