Gold Hallmarking : सोन्याचे दागिने खरे की खोटे! आपली फसवणूक तर झाली नाही ना! असं तपासा

0
2
Gold_Jewellary
सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंग कशी तपासाल?

How to identify Gold Hallmarking is real : सोनं खरेदीसाठी साडेतीन मुहूर्त सर्वात योग्य मानले जातात. दसरा, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. या दिवशी खरेदी केलेलं सोनं लाभतं अशी मान्यता आहे. पण सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. पण जेव्हा कधी सोनं खरेदी करण्याचा विचार कराल. तेव्हा हॉलमार्किंग पाहणं खूपच आवश्यक आहे. सोन्यावरील हॉलमार्किंग हे सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाण आहे. भारतात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्स (BIS) हॉलमार्कच्या माध्यमातून सोन्याच्या शुद्धतेची हमी दिली जाते. पण आजकाल सोन्यावरही खोट्या हॉलमार्किंगची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे हॉलमार्किंग खरं आहे की खोटं याची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वकाही समजून घेणं गरजेचं आहे.

काय आहे सोन्याच्या दागिन्यावरील हॉलमार्किंगचा नियम?

सोनाराला नियमानुसार दागिने विकताना बीआयस स्टँडर्डचं पालन करणं आवश्यक आहे. हॉलमार्क अनिवार्य झाल्यापासून देशात 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातात. अर्थात तुम्ही आता दागिने खरेदीसाठी गेलात तर तुम्हाला 14, 18 आणि 22 कॅरेट सोनंच मिळेल. जर तुम्हाला कोणी 20 किंवा 21 कॅरेट सोन्याच्या दागिनांचं आमिष दाखवलं तर समजून जा की फसवणूक होत आहे. दुसरीकडे, 24 कॅरेट हे सर्वात शुद्ध सोनं मानलं जातं. पण या सोन्याने दागिने तयार होत नाहीत. त्यामुळे 24 सोन्याचे दागिने असल्याचं कोणी सांगितलं तर समजून जायचं की योग्य नाही.

सोन्याच्या दागिन्यावरील हॉलमार्क कसं ओळखायचं?

हॉलमार्किंग केलेल्या दागिन्यांवर BIS चं त्रिकोणी चिन्हं असतं. तसेच तुम्हाला त्यावर 6 अंकी नंबर दिसेल. हा हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID नंबर असतो. या कोडमध्ये अक्षरे आणि अंकांचा समावेश असतो. एकाच HUID नंबरने दोन दागिने नसतात. या व्यतिरिक्त कॅरेट नंबरही तपासून घ्या. 22 कॅरेट म्हणजे 916, 18 कॅरेट म्हणजे 750 आणि 14 कॅरेट म्हणजे 585 नंबर असतो. या अंकावरून तुम्हाला सोन्याचं कॅरेट समजू शकतो. 22 कॅरेट दागिन्यात 91.66 टक्के सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के आणि 14 कॅरेटमध्ये 58.1 टक्के सोनं असतं. यासह इतर धातूचं मिश्रण करून सोन्याचे दागिन तयार केले जातात.

सोन्याच्या दागिन्यावरील हॉलमार्क खरं की खोटं कसं तपासायचं?

BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याच्या दागिन्यांची तपासणी करू शकता. हे अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करा. यात नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागतो. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे ओटीपी व्हेरिफेकेशन होतं. यानंतर तुम्ही या अॅपचा वापर करू शकता. आता दागिने तपसण्यासाठी Verify HUID मध्ये जाऊन HUID नंबर टाका. जर दागिने खरे असतील तर अॅपमध्ये त्याची शुद्धता, प्रोडक्टचं नाव आणि इतर सर्व डिटेल्स समोर येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here