बदलापूरमधील शाळेत निष्पाप मुलींवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यामुळे संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटले होते. आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी जनआक्रोश उसळला होता. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली होती. पण पोलिसांचं पथक तळोजा कारागृहातून आरोपीला घेऊन जात असताना धक्कादायक प्रकार घडला. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने गाडीतून जात असताना पोलिसांची बंदूक हिसकावली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. आरोपीच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. तसेच प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला यात आरोपी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमधील घटना 16 ऑगस्ट रोजी घडली होती आणि हे प्रकरण होऊन एक महिना उलटून गेला आहे.
अल्पवयीन मुलींवर केलेल्या अत्याचारप्रकरणी बदलापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. या प्रकरणी एसआयटी चौकशी करत आहे. आरोपीची दोन लग्न झाल्याची माहितीही समोर आली आहे. पहिल्या पत्नीने सोडल्यानंतर आरोपीने 4 महिन्यात दुसरं लग्न केलं होतं. पण त्याच्या सवयी पाहून दुसऱ्या पत्नीनेही सोडलं आहे. दरम्यान, आरोपीच्या मृत्यूनंतर राजकारणाला वेग आला आहे. यात काही काळंबेरं असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!
अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का??
अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली?
आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू…— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 23, 2024