ट्रेनमधील उशा, चादरी आणि ब्लँकेट महिन्यातून किती वेळा धुतात? रेल्वेने दिलं असं उत्तर

भारतात रेल्वेचं सर्वात मोठं जाळं आहे. सामान्य माणसाला परवडणारा प्रवास म्हणून याकडे पाहिलं जातं. बजेटमध्ये रेल्वेसाठी स्वतंत्र तरतूद केली आहे. रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात. नुकतंच माहितीच्या अधिकारात ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या उशा, ब्लँकेट आणि चादरी महिन्यातून किती वेळा धुतात? त्यावर रेल्वेने आपलं उत्तर दिलं आहे.

0
8
Railway_Bedsheet_Blanket

रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. कारण रेल्वेने प्रवास करताना अपघाताचा प्रमाण कमी आहे. त्यामुळे सामन्य नागरिकांपासून व्हीआयपी रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. पण अनेकदा रेल्वेकडून मिळणाऱ्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली जाते. प्रवाशांना अनेकदा काही गोष्टींचा त्रास होतो. याबाबत वारंवार सोशल मीडियावर रेल्वे प्रशासनावर प्रश्नांचा भडीमारही होतो. त्या प्रश्नांची उत्तरं देता देता रेल्वेच्या नाकी नऊ येतात. आता असाच एक प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली रेल्वे प्रशासनाला विचारण्यात आला आहे. राखीव डब्यातून प्रवास करताना रेल्वेकडून बेडशीट, उशी, ब्लँकेट आणि टॉवेल दिला जातो. पण बेडशीट आणि ब्लँकेटबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेला चादर आणि ब्लँकेटच्या स्वच्छतेबाबत विचारत किती वेळा धुतात असं विचारलं होते. त्यावर रेल्वेने उत्तर दिलं आहे.

द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आरटीआयच्या उत्तरात रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, प्रत्येक ट्रेनच्या प्रवासानंतर वापरलेली चादर, उशी, टॉवेल स्वच्छ केले जाते. यासाठी देशभरात रेल्वेच्या अनेक लॉन्ड्री आहेत. पण ब्लँकेट हे प्रत्येक प्रवासानंतर धुतलं जात नाही. ब्लँकेट महिन्यातून एकदा किंवा दोन धुतलं जातं. पण ब्लँकेट ओलं झालं असेल, अस्वच्छ असेल किंवा त्याचा वास येत असेल तर आधीही धुतलं जातं.

ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या ब्लँकेट, चादर, उशी आणि टॉवेल कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. कारण तिकीट दरातच याचा समावेश असतो. काही ट्रेनमध्ये नाममात्र शुल्क भरून स्वतंत्रपणे घेता येतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here