महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला हळूहळू रंग चढू लागला आहे. महाविकास आघाडी, महायुती आपआपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. दुसरीकडे, स्वतंत्रपणे लढणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षही मागे नाही. मनसेने आपल्या तिसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत 13 जणांची नावं आहेत. या यादीतील एक नाव सध्या चर्चेत आहेत. या यादीत नाशिकचे भाजपा नेत दिनकर पाटील यांचं नाव आहे. आजच त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. दिनकर पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण तीन पक्षांच्या महायुतीत त्यांना काही उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी मनसेची कास धरली. दिनकर पाटील मनसेत येताच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मनसेची विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी
- मंगेश पाटील, अमरावती
- दिनकर पाटील, नाशिक पश्चिम
- डॉ. नरसिंग भिकाणे, अहमदपूर-चाकूर
- अभिजीत देशमुख, परळी
- सचिन शिंगडा, विक्रमगड
- वनिता कथुरे, भिवंडी ग्रामीण
- नरेश कोरडा, पालघर
- आत्माराम प्रधान, शहादा
- स्नेहल जाधव, वडाळा
- प्रदीप वाघमारे, कुर्ला
- संदीप पाचंगे, ओवळा-माजिवडा
- सुरेश चौधरी, गोंदिया
- अश्विन जयस्वाल, पुसद